ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. रशियन सैन्याला अद्याप किव्ह ताब्यात घेता आले नसून, युक्रेनच्या सैन्यासमोर रशिया हतबल झाली आहे. याच दरम्यान रविवारी रशियाने मरिया हे जगातील सर्वात मोठे कार्गो विमान नष्ट केले. युक्रेनने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.
युक्रेनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जगातीलल सर्वांत मोठं कार्गो विमान ‘मरिया’ (द ड्रीम) कीव्हजवळील एका हवाई क्षेत्रामध्ये रशियन सैन्याच्या हल्ल्यात जळून खाक झाले. पण, आम्ही या विमानाची पुनर्बांधणी करु. आम्ही एक मजबूत, स्वतंत्र, लोकशाही युक्रेनचं आमचं स्वप्न जरुर पूर्ण करु. या ट्विटसोबत त्यांनी विमानाचे चित्रही पोस्ट केलं आहे. तसेच सोबत लिहलं आहे की, त्यांनी सर्वांत मोठं विमान जाळून उद्ध्वस्त केलं मात्र, आमची ‘मरिया’ कधीच नष्ट होणार नाही.
एएन-225 मरिया हे सहा इंजिन असलेले विमान होते. 850 किमी प्रति तासाच्या गतीने हे विमान 250 टन माल घेऊन जाऊ शकत होतं. हे विमान पुन्हा तयार तयार करण्यासाठी पाच वर्ष लागू शकतात. तसेच त्यासाठी 3 बिलीयन डॉलरहून अधिक खर्च येऊ शकतो, असा अंदाज शस्त्र निर्मिती करणारे उक्रोबोरोनप्रोम यांनी असा अंदाज बांधला आहे.