मालकीणीने जाहीर केले इनाम
जगातील सर्वात मोठा ससा चोरीला गेला आहे. हा ससा 4 फूट आणि 4 इंच आकाराचा आहे. या आकारामुळेच त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. पण आता त्याची चोरी झाल्याने त्याची मालकीण अत्यंत त्रस्त झाली आहे. मालकीणीने या सशाला घरी पोहोचविणाऱयाला 1 हजार पाउंड म्हणजेच समारे 1.03 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
जगातील या सर्वात मोठय़ा सशाचे नाव डॅरियस असे आहे. तो स्वतःची मालकीण एनेट एडवर्ड्स यांच्यासोबत वर्सेस्टशायरच्या स्टूलटन येथे राहत होता. शनिवारी तो घरातून चोरीला गेला आहे. त्याला कुणी आणि कशासाठी नेले हे स्पष्ट झालेले नाही. त्याची मालकीण पूर्वाश्रमीची मॉडेल आहे. डॅरियस चोरीला गेल्याने ती अत्यंत दुःखी आहे.
एनेट अनेक वर्षांपासून सशांचे ब्रीडिंग करत राहिल्या आहेत. त्यांच्याकडे अनेक विक्रमवीर असलेले सशे आहेत. डॅरियस चोरीला गेल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. डॅरियस अत्यंत वृद्ध असून आता तो ब्रीडिंग करू शकत नाही. याचमुळे कृपा करून ज्याने त्याला उचलून नेले असेल त्याने तो परत आणून द्यावा असे आवाहन एनेट यांनी केले आहे.
पोलीस देखील स्वतःकडून डॅरियसला शोधण्याचा आणि घरी परत आणण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याची माहिती एनेट यांनी दिली आहे. डॅरियस अत्यंत लोकप्रिय आहे. तो टीव्ही शो आणि अन्य आयोजनांमध्ये दिसून यायचा. पण आता एनेट यांनी त्याला शांत आणि उत्तम जीवन जगता यावे म्हणून शो आणि आयोजनांमध्ये पाठविणे बंद केले होते.