वॉशिंग्टन
दुसऱया जागतिक महायुद्धानंतर सोव्हीएत संघाने स्वतःला समुद्रामध्ये सर्वात शक्तीशाली बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यात रशिया अव्वल स्थानी आहे. यासंदर्भात अमेरिकन संरक्षण तज्ञ एचआय सटन यांनी एक संशोधन करुन दिग्गज पाणबुडींची यादी सादर केली आहे. या यादीत सर्वात शक्तीशाली पाणबुडी म्हणून रशियाची टायफून क्लास पाणबुडी पहिल्या स्थानी राहिली आहे. यात बॅलिस्टिक मिसाईलयुक्त पाणबुडी असल्याची माहिती आहे. यादीत दुसरी अमेरिकेची ओहियो क्लास सबमरीन या पाणबुडीचा समावेश असून ही घातक ऍटी शिप मिसाईलच्या मदतीने हल्ला करण्याची क्षमता असणारी आहे. रशियातील पाणबुडींचा विचार करता पहिल्या नंबरवर टायफून क्लास, दुसऱया बोरेई क्लास आणि तिसऱया स्थानी ऑस्कर सेंकड क्लास ही पाणबुडी आहे. त्यानंतर अन्य पाणबुडींचा समावेश होत असल्याची माहिती आहे. यामध्ये भारतानेही विकसित देशांकडून दहा वर्षाच्या भाडेतत्वावर पाणबुडी घेत असून याच्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. भारत हा एकटाच देश नसून अन्य मित्र देशही अशाप्रकारे पाणबुडी घेत असल्याची माहिती आहे.