ऑनलाईन टीम / मुंबई :
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी सातव्या स्थानावर पोहचले आहेत. अंबानी यांनी प्रसिद्ध उद्योजक वॉरेन बफेट यांनाही मागे टाकले आहे.
ब्लूमबर्गने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
कोरोना संकतातही जगभरातील विविध कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याने रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ दिसून आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 70 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
अंबानी यांचा जगातील 10 सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला असून, त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनाही मागे टाकले आहे. बफेट यांची एकूण संपत्ती 67.9 अब्ज डॉलर आहे. रिलायन्सच्या डिजिटल उद्योगात 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याने मार्चपासून त्यांचे शेअर्स दुप्पट झाले आहे.