अर्थमंत्री निर्मला सीतारामन 41 व्या क्रमांकावर
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
फॉर्ब्सने जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 41 व्या क्रमांकावर आहेत.
फॉर्ब्सने 17 व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश केला आहे. त्यामध्ये 10 देशांतील प्रमुख महिला, 38 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाच मनोरंजन क्षेत्राशी संबंधित महिला आहेत.
जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून यशस्वी कामगिरी केल्यामुळे जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल पहिल्या स्थानी, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी देशाला कोरोना महामारीतुन बाहेर काढल्यामुळे त्यांना या यादीत दुसरे स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना 55 वे तर किरण मजूमदार शॉ यांना या यादीत 68 वे स्थान देण्यात आले आहे.