न्यूयॉर्क : जागतिक स्तरावर कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली असल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात विविध देशांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 10 लाख इतक्मया संख्येने वाढल्याचे दिसून आले आहे. मागच्या आठवडय़ाच्या तुलनेमध्ये या आठवडय़ात कोरोना रुग्णांमध्ये जवळपास आठ टक्क्मयांची वाढ जागतिक स्तरावर दिसली आहे. जवळपास 43000 जणांनी नव्याने कोरोनामुळे मागच्या आठवडय़ामध्ये आपला प्राण गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. एक मात्र आहे, की जागतिक स्तरावर कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मृत्युसंख्या वाढली नाही ही एक दिलासादायी बाब म्हणता येईल. पश्चिम पॅसिफिक आणि आफ्रिकेमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसले आहे. मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिकेत रुग्णांच्या संख्येमध्ये 20 टक्के इतकी घट दिसली आहे. युरोपमध्ये मात्र दोन टक्के इतकी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती आहे.
Previous Articleराशींचा देश-टॅरोचा संदेश अर्जुनवीर साई सोशल, ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघ क्वॉलिफायर फेरीत
Next Article आसामच्या चहा कंपनीकडून वोल्दोमिर झेलेंस्कींचा सन्मान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.