ऑनलाईन टीम / मेलबर्न :
कोंबड्यांमधील अपोकॅलिप्टिक व्हायरस कोरोनापेक्षाही भयंकर असून, तो पसरल्यास जगाची निम्मी लोकसंख्या संपेल, अशी भीती ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ मायकेल ग्रेगरी यांनी येथे व्यक्त केली.
ग्रेगरी म्हणाले, कोरोनाची अवघ्या जगाला झळ बसली आहे. आता आणखी एका नव्या विषाणूचा आपल्याला धोका आहे.
अपोकॅलिप्टिक असे त्याचे नाव असून, तो अत्यंत धोकादायक आहे. सध्या या व्हायरसने कोंबड्यांमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून हा विषाणू वेगाने पसरू शकतो. तसे झाल्यास भयानक परिस्थिती निर्माण होईल.
यातून आपण दुसऱ्या महामारीकडे वळू शकतो. ते टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जगाने शाकाहाराकडे वळण्याचा सल्लाही ग्रेगरी यांनी दिला आहे.