नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी जग्वार लँड रोवरने काही महिन्यांपूर्वी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आय-पेसच्या रुपात सादर केली होती. सदरच्या गाडीकरीता आता खरेदीसाठी बुकिंग सुरू झाले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आय-पेस ब्लॅक नावाने सदरची गाडी दाखल झाली असून गाडीचा लुक आकर्षक असून पॅनारोमीक रुफची जोड दिली आहे. 90 केडब्ल्यूएचची बॅटरी या गाडीला असून 4.8 सेकंदात शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तास इतका वेग गाडी घेऊ शकते.