मुंबई
टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हर कारच्या तिमाहीतील विक्रीमध्ये 12 टक्के वाढ झाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ही वाढ वर्षाच्या तुलनेमध्ये नेंदली गेली आहे. कंपनीने जागतिक स्तरावर ती 1 लाख 23 हजार 483 गाडय़ांची विक्री केली आहे. चीनमध्ये कारच्या विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विक्रीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. उत्तर अमेरिकेतही कार विक्रीमध्ये 14 टक्के आणि इंग्लंड, युरोपसारख्या देशांमध्येदेखील कारच्या विक्रीमध्ये 20 टक्के घट दिसली आहे.