ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना विषाणू पुर्णतः नष्ट करणे आणि जगाला कोरोनापासून मुक्त करणे आता अशक्य आहे, असे अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसिज रिसर्च अँड पॉलिसी या संस्थेचे संचालक व संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ मायकेल ऑस्टरहोल्म यांनी म्हटले आहे.
ऑस्टरहोल्म म्हणाले, कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या विषाणूच्या साथीवर नियंत्रण ठेवता येईल, पण त्याला पुर्णतः नष्ट करणे आता अशक्य आहे. त्यामुळे कोरोना विषाणू आपल्या जीवनाचा एक भाग समजून जगता आले पाहिजे.
भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. सध्याची जी परिस्थिती आहे, ती पुढे राहणार नाही. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होतील. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्याही लस उपलब्ध होतील, मात्र, विषाणू होईलच असे नाही. दरम्यान, अमेरिकेतील आघाडीचे संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनीही काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही, असे वक्तव्य केले होते.