पर्यटन स्थळांची केली भ्रमंती
प्रतिनिधी / कुडाळ:
भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू अजय जडेजा व जलदगती गोलंदाज आशिष नेहरा यांनी सिंधुदुर्गची सफर करताना श्रीरामवाडी (कोचरा-वेंगुर्ले) येथील प्रसाद रेगे यांच्या फार्महाऊसमध्ये एक दिवस मुक्काम करून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला. माशांच्या जेवणाचाही त्यांनी आस्वाद घेतला. आपण पुन्हा येऊ, असे सांगत त्यांनी वेंगुर्ल्याकडे प्रयाण केले.
या फार्महाऊसचे आर्किटेक्ट दिल्ली येथील असून त्यांच्या ओळखीने हे दोघे दोन दिवसांपूर्वी श्रीरामवाडी येथे दाखल झाले. संपूर्ण परिसर व थेट समुद्राला लागून असलेल्या या फार्महाऊसने या दोघांना भुरळ घातली. त्या परिसरातील समुद्र किनाऱयावर फिरताना त्यांनी फोटोग्राफी केली. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांची माहिती घेतली. प्रसाद रेगे तसेच लालू पटेल व सहकाऱयांनी त्यांना या भागाची माहिती दिली. आपणास हा परिसर खूप आवडला. आपण पुन्हा येऊ, असे ते म्हणाले.
आर्यन पटेल या मुलाने बॅटसह त्यांची भेट घेतली. अंजली पटेल हिनेही गप्पा केल्या. हे दोघे क्रिकेटपटू विमानाने गोवा येथे आले. तेथून ते सिंधुदुर्गात आले. मंगळवारी सायंकाळी म्हापण, पाट, आंदुर्ले खिंड, केळूस, वेंगुर्ले आदी ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली. यावेळी सागर पालकर, नीलेश उमळकर उपस्थित होते.