प्रतिनिधी / जत
जत नगर परिषदेच्या प्रभाग पाच साठी अत्यंत चुरशीने झालेल्या पोट निवडणुकीत मंगळवारी 61 टक्के मतदान झाले. एकूण 3400 पैकी 2057 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक इकबाल गवंडी यांच्या निधननंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक लागली होती. येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. आज बुध वारी सकाळी 10 वाजता बचत भवन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्व. गवंडी यांचे पुत्र इम्रान गवंडी तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गजानन उर्फ राजू यादव रिंगणात होते. भाजपने येथे गवंडी कुटुंबीयांना साहनभुती दाखवत पाठिंबा दिला होता. त्यामूळे चुरशीने दुरंगी लढत झाली. शिवाय या निवडणुकीकडे वर्षभरात होणाऱ्या पालिका निवडणुकीची लिटतस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे. यामुळे निवडणुकीत मोठी रंगत आली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे आज लागणारा निकाल शहरातील राजकारणाच्या दृष्टीने मह्त्वपूर्ण मानला जात आहे.