प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात जनगणती करण्यासाठी आवश्यक तयारीस प्रारंभ झाला आहे. दि. 15 एप्रिल ते 29 मे दरम्यान घरोघरी जावून प्राथमिक माहिती घेण्यात येणार आहे. याकरिता गणतीदार नियुक्ती करण्यात येणार असून याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापालिका कार्यालयात चार्ज अधिकाऱयांची बैठक झाली. गणतीदार नियुक्त करण्याची सुचना करण्यात आली.
शहरातील जनगणतीस प्रारंभ करण्याच्यादृष्टीने गणतीदार नियुक्त करण्यात येणार आहे. याकरिता दोन नोडल आधिकाऱयांची नियुक्ती झाली असून शुक्रवारी महापालिका कार्यालयात बैठक झाली. सध्या नोडल अधिकारी व मास्टर टेनर नियुक्त करण्यात आले आहे. 14 फिल्ड मास्टर ट्रेनर आणि गणतीदार नियुक्त करणे आवश्यक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. घराची गणती तसेच कुटूंब प्रमुखाचे नांव, कुटूंबातील महिला व पुरूष्य सदस्यांची संख्या आदी माहिती पहिल्या टप्यात घेण्यात येणार असल्याची माहिती नोडल अधिकारी एस.ए. कलकुपी यांनी दिली. याकरिता गणतीदार नियुक्त करण्यात येणार आहे. सदर कामकाज सुरू करण्याची सुचना चार्ज अधिकाऱयांना दिली. यावेळी महापालिकेच्या सामान्य प्रशासन अधिकारी कविता योगपण्णावर, मास्टर टेनर शाम प्रसाद, नागराज काळे आदीसह महापालिकेचे चार्ज अधिकारी प्रभारी कौन्सिल सेपेटरी एफ.बी.पिरजादे, सहाय्यक कार्यकारी अभियंते मल्लिकार्जून नरसण्णावर, आर.एच कुलकर्णी, एस.बी.मुर्तेण्णावर, एस.बी.चौगुला आदीसह अधिकारी उपस्थित होते.