प्रतिनिधी/ सातारा
जनगणनेसाठी मोठया संख्येने शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळं शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्टया रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकाऱयांनी शिक्षणाधिकाऱयांना तशा नोटीसा पाठवल्या आहेत. जिह्यात अकरा तालुक्यात एकून मिळून 7 हजार 866 प्राथमिक शिक्षक आहेत.
2021 मध्ये जनगणना करण्यात येणार आहे. 1 मे 2020 ते 15 जून 2020 या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणं, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या रजा रद्द केल्या जाणार आहेत. मे महिन्यातील सुट्टयाही रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळं वर्षातील 76 पैकी तब्बल 39 सुट्टयांना शिक्षकांना मुकावं लागणार आहे. या कालावधीत अनेक कामे करावी लागणार आहेत. पालिका, खाजगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये अशा सूचना या नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या सुट्टया रद्द करण्यात येणाच्या जनगणना अधिकाऱयांच्या निर्णयामुळं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये तीव्र नाराजी आहे. जिह्यात प्राथमिक विभागात अकरा तालुक्यात एकून मिळून 7 हजार 866 प्राथमिक शिक्षक आहेत. प्राथमिक शिक्षण विभागात सुट्टया रद्दची नोटीस आली आहे. त्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीचे काम लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विस्तार अधिकारी व्ही. एच. मोरे यांनी दिली आहे.