वृत्तसंस्था/ मुंबई
पंतप्रधान जनधन योजनमध्ये (पीएमजेडीवाय) 55 टक्के खाती ही महिलांच्या नावे आहेत. यामध्ये फेब्रुवारी 2021 पर्यंत एकूण 41.93 कोटी बँक खाती होती. पैकी महिलांच्या नावे 23.21 कोटी खाती आहेत. सदरची आकडेवारी ही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सादर केली आहे.
मुद्रा योजनेत 6.36 लाख कोटींचे कर्ज
दुसऱया बाजूला पंतप्रधान मुद्रा योजनेमध्ये (पीएमएमवाय) 26 फेबुवारी 2021 पर्यंत एकूण 19.4 कोटी खातेदार महिलांना कर्ज दिले आहे. याच्या आधारे एकूण 6.36 लाख कोटी रुपयांची कर्जे वितरीत केली आहेत.
2014 मध्ये जनधनचा प्रारंभ
जनधन योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मधील ऑगस्टमध्ये केली होती. त्याची सुरुवात ही 28 ऑगस्टला करण्यात आली आहे. वर्ष 2018 मध्ये सरकारने पीएमजेडीवाय 2.0 ची सुरुवात केली होती.