इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्यूरोकडून माहिती सादर : 35 हजार कोटींचे दावे निकाली
वृत्तसंस्था/ मुंबई
विमा क्षेत्रात कार्यरत असणाऱया जनरल इन्शुरन्स कंपनीने वर्ष 2018-19 च्या दरम्यान एकूण 35 हजार 519 कोटी रुपयांचे वाहन विम्याचे दावे निकाली काढले आहेत. विमा व्यवसायात कंपनीने केलेली ही कामगिरी नोंदणीय ठरली आहे.
याच दरम्यान कंपनीने 64 हजार 522 कोटी रुपयांचा प्रीमियम प्राप्त केला आहे, अशी माहिती इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्यूरो यांच्याकडून देण्यात आली आहे. 18 हजार 262 कोटी वाहनांना डॅमेज झाल्यावर आणि 14 हजार 257 कोटी रुपयांचे पेमेंट हे थर्ड पार्टीकरीता दिले आहे. उपलब्ध अहवालानुसार देशामध्ये 2019 मध्ये 15 राज्यांमध्ये जवळपास 57 टक्के वाहने ही विना विम्याची चालविली जात असल्याची माहिती आहे. हे प्रमाण कमी होण्याची गरज आहे.
वार्षिक अहवालामध्ये ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये दाव्याच्या स्वरुपात जवळपास 35 हजार 519 कोटी रुपयांची रक्कम विमाधारकांना दिलेली आहे.
वाहन विमा मोठा व्यवसाय
मोटार इन्शुरन्स सलग जनरल इन्शुरन्स कंपन्यांसाठी एक मोठा व्यवसाय म्हणून आपले स्थान मजबूत करुन राहिला आहे. तसेच मागील वर्षातील समान कालावधीत 64 हजार कोटीपेक्षा अधिकचा प्रीमियम प्राप्त केला आहे. ही वाढ 2018-19 च्या तुलनेत 9 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती यावेळी दिलेली आहे.