कंपनीचे जवळपास 4 हजार कर्मचारी प्रभावीत होणार ?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकी वाहन निर्मिती कंपनी जनरल मोटर्स महाराष्ट्रात असणारा प्रकल्प विकण्याच्या तयारीत आहे. कंपनी सदरचा प्रकल्प हा चीनची वाहन कंपनी ग्रेट वॉट मोटर्सला विकणार आहे. हा व्यवहार जवळपास 1.83 ते 2.19 हजार कोटी रुपयांमध्ये होण्याचा अंदाज आहे. कंपनीला हा व्यवहार याच वर्षात होणार असल्याची अपेक्षा होती. पण सध्याला सीमेवरील भारत-चीनच्या वाढत्या तणावाची परिस्थिती पाहता या व्यवहाराला विलंब होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
जनरल मोटर्सने जानेवारीत प्रकल्प विक्रीची घोषणा केली होती. तेव्हापासून हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. सध्यातरी कोणत्याही पातळीवर प्रकल्प सुरु करण्याची मानसिकता कंपनीची नाही. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार येत्या वर्षापर्यंत हा प्रकल्प बंदच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
सदर कंपनीत काम करणारे जवळपास 4 हजार कर्मचारी यामुळे प्रभावीत राहणार असल्याची माहिती आहे. तसेच 2017 पासून प्रकल्पातील उत्पादन विक्रीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहे.
विक्रीची योजना
साधारणपणे जनरल मोटर्स मॅन्युफॅक्चर्समधून बाहेर पडून आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी 250 ते 300 दशलक्ष डॉलरमध्ये हा प्रकल्प विकण्याची योजना आखण्यात आली आहे. परंतु सदर व्यवहारातील विलंबामुळे कंपनीला आता लेबरचा खर्च द्यावा लागणार आहे. यामुळे कंपनीला नुकसान सहन करावे लागणार आहे.