नव्या वर्षात टोयोटाची झेप टॉपवर : जीएमकडून स्पष्टीकरण
सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेतील सर्वात मोठी वाहन कंपनी जनरल मोर्ट्सला नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळातच मोठा झटका बसला असून कंपनीचा मागील 90 वर्षांपासून असणारा दबदबा समाप्त झाल्याने कंपनी दुसऱया स्थानी राहिली आहे. दुसऱया बाजूला जपानची वाहन निर्मिती कंपनी टोयोटाने सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.
वर्ष 2005 पर्यंत टोयोटा अमेरिकेतील बाजारात चौथ्या नंबरवर राहिली होती. परंतु 2021 वर्ष येईपर्यंत ही स्थिती काही प्रमाणात सुधारत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये अमेरिकेतील दिग्गज वाहन कंपनी म्हणून ओळख असणारी जनरल मोर्ट्स गेली 90 वर्षे अव्वल स्थानी राहिली होती. ही कंपनी सर्वाधिक कार विकत असल्याची नोंद होती. ही कामगिरी आता जपानच्या टोयोटाने आपल्या नावावर केली आहे.
टोयोटाची कॅमरी मागील 20 वर्षात अमेरिकेमध्ये सर्वाधिक विक्री होणारी प्रवासी कार बनली आहे. एसयुव्ही गटात बेस्ट सेलिंगची मक्तेदारी मागील पाच वर्षात रेव्ह 4 यांनी आपल्याजवळ ठेवली आहे. आता जीएम, फोर्ड आणि क्रिसलरची हिस्सेदारी घटून 38 टक्के राहिली आहे. जर यामध्ये टेस्लाचा समावेश केला तर हा टप्पा 40 टक्क्यांवर पोहोचतो.
जीएमचे स्पष्टीकरण
जीएमच्या अधिकाऱयानी वाहनांच्या किमती अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच विक्रीत घसरण असतानाही वाढीव किंमतीमुळे कंपता लाभ प्राप्त करता आला आहे. इनसाट्सचे व्यवस्थापकिय संचालक व सीईओ जेसिका कैल्डवेल यांनी म्हटल्याप्रामणे ही टोयोटासाठी मोठी कामगिरी ठरली आहे. परंतु दीर्घ कालावधीपर्यंत आता या एकंदर कामगिरीत बदल नसणार असल्याचेही सीईआंsनी म्हटले आहे.