वार्ताहर/ ताम्हाने
पुन्हा नव्याने सुरू झालेल्या साखरपा चेकपोस्ट येथे गुरांची अवैध वाहतूक करणारी टाटा झेनोन पिकअप् गाडी पकडण्यात आली. या प्रकरणी संजय राजू साळुंखे (24), सचिन राजू साळुंखे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गाडीमध्ये असणारी जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. ही गाडी चिपळूणवरून कडेगाव सांगली येथे नेण्यात येत होती.
संशयित आरोपींकडे कोणताही वाहतुकीचा परवाना नव्हता. रत्नागिरी जिल्हा अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी सध्याच सुरू केलेल्या चेकपोस्टमुळे ही कारवाई पार पाडण्यात आली. पोलीस निरिक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार संजय उकार्डे, कॉन्स्टेबल रोहित यादव यांनी मोठय़ा शिताफीने ही कारवाई केली. प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास ए. एस. आय संजय उकार्डे, कॉन्स्टेबल रोहित यादव, किरण देसाई व अन्य कर्मचारी करत आहेत.