गणेशपुरी म्हापसा येथील प्रकार
प्रतिनिधी / म्हापसा
गणेशपुरी-हाऊसिंगबोर्ड, म्हापसा येथे भरवस्तीच्या ठिकाणी दिवसांढवळय़ा जनावरांची बेकायदा कत्तल करणाऱया चौघांना म्हापसा पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले. गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कत्तलस्थळी घातलेल्या छाप्यात आतापर्यंत शाम ईमामसाब बेपारी( 60) जाकीरहुसेन मोहम्मद शरिफ बेपारी (26) तसेच मुस्ताक जंगासाब बेपारी (23) यांच्या मुसक्मया आवळल्या असून त्यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
डॉ. पी.व्ही.कोरगांवकर यांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाण पत्रांनुसार सदरची कत्तल बकरा जातीच्या प्राण्यांची झालेली असून अस्वच्छ परिसरात ही कत्तल करण्यात येत होती. दरम्यान, म्हापसा पोलिस स्थानकाचे गस्ती पथक आपल्या नियमित मार्गावर असता महिला पोलिस अधिकारी विभा वळवईकर यांना गणेशपुरी-हाऊसिंग बोर्ड परिसरात दिवसांढवळय़ां बेकायदा जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले असतां त्यांना घर क्र ः 235/9, तसेच प्लॉट क्र ः 11 मध्ये उघडय़ावर चाललेली जनावरांची कत्तल करतांना तिघेही संशयित सापडले.
अत्यंत घाणेरडय़ा जागेत कुठल्याही प्रकारची स्वच्छता न राखता ही कत्तल चालली होती असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बेकायदा जनावरांची कत्तल करण्यात गुंतलेल्या संशयित शाम ईमामसाब बेपारी, जाकीरहुसेन महमद शरीफ बेपारी तसेच मुस्ताक जंगासाब बेपारी यांच्या घटनास्थळीच मुसक्मया आवळल्या व तिघांंही संशयितांविरोधात भारतिय दंड संहितेच्या वेगवेगळय़ा कलमांनुसार रितसर गुन्हां दाखल करून घेतला. सध्या संशयित आरोपी म्हापसा पोलिस स्थांकाची हवा खात आहेत.
दरम्यान, राज्यात टाळेबंदी लागुं असतांना जनावरांची अस्वछ वातावरणात बेकायदा कत्तल करून जनतेच्या जिवीताशी खेळणाऱया दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच यापुढे असे प्रकार होणार नाहीत यांकडे पोलिस आणी जनतेने लक्ष पुरविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स़जय बर्डे यांनी केली आहे. पुढील तपास महिला उप-निरीक्षक विभा वळवईकर निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.