वार्ताहर /कंग्राळी खुर्द :
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जनावरांच्या बाजारातील व्यापारी संघटनेतर्फे बाजार समिती अध्यक्ष युवराज कदम यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजीवकुमार हिडदुग्गी यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप मारुती कुंडेकर, सचिव शकील बेपारी, खजिनदार प्रवीण तेली यांच्यासह सभासद नारायण पाटील, विलास नाईक, अडव्याप्पा कुलगोड, जोतिबा जाधव, गुंडू पायाण्णाचे, शट्टू जानगवळी, एकनाथ पाटील, परशराम मरगाळे, शेतकरी, व्यापारी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.