मानवी शरीरात लहानात लहान गोष्टीचीही मोठी आवश्यकता असते. गंधशक्तीचे देखील महत्त्वाचे कार्य आहे. सर्दी झाल्यावर खाण्यापिण्याच्या पसंतीच्या गोष्टींचा गंध येत नाही तेव्हा त्याचे महत्त्व समजते. कोरोना संक्रमितांमध्ये गंधशक्ती जाणे एक महत्त्वाचे लक्षण आहे. परंतु इंग्लंडच्या एका महिलेमध्ये जन्मापासून गंधशक्ती नव्हती.
लंडनमध्ये राहणाऱया 25 वर्षीय नॅन्सी सिंप्ससने जीवनभर आपण कुठल्याच गोष्टीचा गंध घेऊ शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. नॅन्सीला जन्मापासूनच गंधशक्ती नव्हती. फूल, खाद्यपदार्थ, अत्तर यासारख्या कुठल्याच गोष्टीच्या गंधाचा तिला अंदाज नव्हता. परंतु कोरोना विषाणूने तिच्यावर सकारात्मक प्रभाव पाडला आहे. जगभरात ज्या विषाणूने संकट उभे केले, तोच तिच्यासाठी वरदान ठरला आहे.
नॅन्सी डिसेंबर 2021 मध्ये कोरोनाबाधित झाली होती. तिने स्वतःला घरात आयसोलेट केले होते. काही दिवसांनी तिची प्रकृती सुधारू लागल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा गंध येत असल्याचे तिच्या लक्षात आले. पूर्वी जेवणाची चव समजत होती, परंतु त्याचा गंध येत नव्हता. कोरोनाबाधित झाल्यावर नॅन्सीला हा गंध येऊ लागला आहे.
आता करते अत्तराचा वापर
लोकांसाठी ही सामान्य गोष्ट असेल परंतु माझ्यासाठी अत्यंत मोठी बाब आहे. 25 वर्षांपर्यंत मला कुठल्याच गोष्टीचा गंध आला नव्हता. आता गंधशक्ती मिळाल्याने मी स्वतःच्या घराला फुलांनी सजविते. अनेक अत्तरांचा वापर करत असल्याचे नॅन्सनी सांगितले आहे. आता तिला फळे आणि मेणबत्तीचा गंध घेणे अत्यंत पसंत आहे. अनेकदा ती दुर्गंधीयुक्त गोष्टींचाही गंध येते.