वार्ताहर / खानापूर
जन्मोजन्मी हाच पती मिळावा, असे साकडे घालत पती-पत्नीचे नाते सातजन्मी लाभावे, अशी प्रार्थना करत अनेक सुवासिनींनी ज्ये÷ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेच्या निमित्ताने पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा.
गुरुवारी दिवसभर वटपौर्णिमेच्या निमित्ताने खानापूर शहरासह तालुक्मयातील ग्रामीण भागात वटवृक्षाच्या झाडाला सुवासिनी नटून-थटून आपल्या पतीराजाच्या आयुष्यासाठी साकडे घालताना दिसत होत्या. शहरासह ग्रामीण भागात सुवासिनींनी सकाळपासूनच आपल्या उपवासाची तयारी करून वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियोजन केले होते. मागील वषी वटपौर्णिमेच्यावेळी कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने वटपौर्णिमा घरातच साजरी करावी लागली. जवळच्या वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी देखील मागील वषीच्या वटपौर्णिमेला मर्यादा आली होती.
कोनोना संसर्गाच्या नियमांचे पालन
यावषी सद्य परिस्थितीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बऱयाच अंशी आटोक्मयात आला असला तरी कोरोना नियमांचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक सुवासिनी दिवसभरात घर, गाव परिसरातील वटवृक्षाच्या झाडांना प्रदक्षिणा घालून पती राजाच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली. वटपौर्णिमा गुरुवारी असल्याने सुवासिनींनी गेल्या दोन दिवसांपासून बाजारातून साहित्य आणून पूजेची तयारी केली होती. पूजेला लागणारे फळफळावळ व इतर साहित्य खरेदी करून सकाळपासूनच नटून-थटून अनेक वटवृक्षाच्या ठिकाणी गर्दी केली होती. शहर व ग्रामीण परिसरात अलिकडे वटपौर्णिमाही भक्तिभावाने साजरी करण्याची परंपरा वाढली आहे. अनेक ठिकाणी वडाचे झाड जवळपास नसले तरी वटवृक्षाच्या रोपटय़ांचे अथवा वडाच्या फांदीची पूजा करण्याचीही अनेक ठिकाणी परंपरा आहे.
ग्रामीण भागातही उत्साहात वटपौर्णिमा साजरी
खानापूर तालुक्मयातील ग्रामीण भागामध्ये गावागावात, रस्त्याच्या कडेला वटवृक्षाची झाडे अधिक प्रमाणात असल्याने पारंपरिकरित्या जोपासणाऱया वटवृक्षाला पूजेचा पहिला मान देण्याची परंपरा आहे. यानुसार हा वटपौर्णिमेचा दिवस देखील हिंदू धर्मातील सण, प्रथा, परंपरा व निसर्गाच्या संस्कृतीला जोडला गेला
आहे.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी मनोभावे सौभाग्यवती वडाच्या झाडाला सूताचा धागा गुंडाळून पूजा करताना दिसत होत्या. मिळेल तिथे वडाच्या झाडाची पूजा करत आजचा दिवस आनंदात घालताना दिसत होत्या. वटपौर्णिमेच्यादिवशी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालत धागा बांधत होत्या.
नवविवाहिता महिलांचा आनंद द्विगुणीत
सौभाग्याचं लेणं हळद-कुंकू लावून आंब्याचे वाण देऊन ओटय़ा भरण्याची परंपरा आजही आहे. नवविवाहिता महिलांचाही हा उत्साहाचा, आनंदाचा दिवस असतो. आजी, आई, सासू यांच्यासमवेत नव्या पिढीतील सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे करताना दिसत
होत्या. खानापूर तालुक्मयातील बहुतांश गावांमध्ये वटपौर्णिमा सण मोठय़ा मनोभावे करताना सुवासिनी दिसत होत्या. कुटुंबांतील सुख, समाधान व कुटुंबात निर्माण होणारा आनंद याहून वेगळा नसतो. पती-पत्नीतील नाते, दृढ निश्चय, संसार, संस्काराला प्रेरणा देणारा हा आनंद ठरतो. एकमेकांवरील विश्वास या वटपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दृढ होते.