टोकीयो
जपान मंत्रिमंडळाने संरक्षण दलाच्या मजबुतीकरणासाठी सर्वाधिक रक्कमेची तरतूद केली असल्याची माहिती आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संरक्षण दलाच्या मजबुतीसाठी आर्थिक वर्ष 2022 साठी 940 अब्ज डॉलर्सची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आहे. जपान सरकारने सलग दहाव्या वषी अशाप्रकारे सर्वाधिक रकमेची तरतूद संरक्षण विभागासाठी केली आहे. सदरची रक्कम ही विक्रमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे सामाजिक सुरक्षिततेसाठी 440 अब्ज येन इतकी रक्कम तरतूद केली गेली असल्याचेही सांगितले जात आहे. वैद्यकीय खर्चासाठी लागणाऱया तरतुदीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. विशेषतः संरक्षण विभागासाठीही अधिकची रक्कम खर्च केली जाणार आहे. 5.40 ट्रिलियन येन इतकी रक्कम संरक्षणासाठी ठेवतानाच 5 ट्रिलियन येन इतकी रक्कम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अडचणींना तोंड देण्यासाठी राखून ठेवली असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे करांच्या माध्यमातून 65 ट्रिलियन येन इतका विक्रमी महसूल प्राप्त केला जाण्याची शक्मयताही सरकारने व्यक्त केली आहे.