वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचा टॉप सीडेड पुरूष बॅडमिंटनपटू केंटो मोमोटा याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जपानच्या बॅडमिंटन संघटनेने दिली आहे. त्यामुळे थायलंडमध्ये होणाऱया दोन स्पर्धांसाठी आपला संघ पाठविण्याचा निर्णय जपानने घेतला आहे.
जपानच्या 26 वर्षीय बॅडमिंटनपटू मोमोटा हा विश्व पुरूष बॅडमिंटनपटूंच्या मानांकन यादीत अग्रस्थानावर आहे. एक वर्षांपूर्वी मोमोटाला वाहन अपघातात गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो वर्षभर बॅडमिंटनपासून अलिप्त होता. थायलंडमधील स्पर्धेसाठी जाणाऱया जपानच्या सर्व बॅडमिंटनपटूंची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि या चाचणीत हे सर्व बॅडमिंटनपटू निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. तरीही जपानच्या संघटनेने संघ न पाठविण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवडय़ात मोमोटाने अखिल जपान बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.