सिनसिनॅटी : डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स माहिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका आणि ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड ऍश्ले बार्टी यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली. बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात ओसाकाने अमेरिकेच्या कोको गॉफचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड बार्टीने दुसऱया फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या वॅटसनवर 6-4, 7-6 (7-3) अशी मात करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. ओसाकाचा पुढील सामना स्वीसच्या टिचमनशी होणार आहे. हॅलेपने मांडीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतल्याने तिच्या प्रतिस्पर्धीला पुढे चाल देण्यात आली.
Previous Articleहुमरमळा-वालावल गाव विकासाचे मॉडेल!
Next Article पुढचे पाऊल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.