500 प्रकारच्या 35 लाख फुलांनी मोहरला 54 एकरमधील क्षेत्र
54 एकरमध्ये फैलावलेले जपानचे कुजू फ्लॉवर पार्क बहरून गेले आहे. वसंत ऋतूत येथील 500 प्रकारची 35 लाख फुले फुलली आहेत. उद्यानात येणारे पर्यटक वाढले तर प्रशासन ते बंद करण्याची भीती स्थानिक लोकांना आहे. याचमुळे प्रतिदिन मर्यादित संख्येत पर्यटकांना प्रवेश देण्यात यावा असे आवाहन लोकांनी केले आहे. तरीही संख्या वाढल्यास पार्कचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जावे आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात यावीत असे म्हटले गेले आहे.
मागील वर्षी टाळेबंदीतच लोक येथे पोहोचत होते, तसेच कोविड-19 च्या नियमांचे पालन करत नसल्याने प्रशासनाने पार्क बंद केला होता. लोकापर्यंत येथील सौंदर्य पोहोचविण्यासाठी पार्कचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले होते.
23 हजार लोकसंख्या असलेल्या तकेता शहरात दरवर्षी 10 लाख पर्यटक पोहोचतात. मागील वर्षी 7 हजार चौरस मीटरमध्ये फैलावलेल्या फुरुसुका पार्कमधील 100 प्रकारची 8 लाख टय़ुलिपची फुले हटविण्यात आली होती.