ऑनलाईन टीम / टोकियो :
प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी जनतेची माफी मागत पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
आबे यांना अल्सरचा त्रास आहे. त्यांच्या आतड्याला मोठ्या प्रमाणात सूज असून, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. त्याचा सरकारी कामावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी आज पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना आबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. तसेच ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्याने मनाला प्रचंड वेदना होत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर 2021पर्यंत होता.
दरम्यान, करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात आबे प्रशासनाला अपयश आले. त्यावर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आठ वर्षाच्या या कार्यकाळात पहिल्यांदाच त्यांच्या लोकप्रियतेत 30 टक्क्यांची घट झाली.