बुकिंग सुविधेला सुरूवात : मर्यादित दुचाकींची निर्मिती
नवी दिल्ली : जपानमधील एका कंपनीने हवेत उड्डाण घेणारी दुचाकी बनवली आहे. यामुळे आगामी काळात ट्रफिकसह अन्य समस्यांमधून सुटका होणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. यामध्ये टोक्यो बेस्ड ड्रोन स्टार्टअप एएलआय टेक्नॉलॉजी यांनी होव्हरबाईकला तयार केले असून या दुचाकीला एक्सटुरिझम लिमिटेड एडिशन असे नाव ठेवले आहे. सदरच्या दुचाकीची चाचणी करण्यात आल्यानंतर यांचे बुकिंग 26 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहे.
कंपनी फक्त 200 फ्लाइंग दुचाकी बनविणार
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार कंपनी फक्त 200 फ्लाइंग दुचाकीची निर्मिती करणार आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाइसुके कटानो यांनी दिली आहे. तसेच आम्ही जमीन किंवा आकाशात प्रवास होण्यासाठीची आवड विचारतो आणि ग्राहकांना त्याप्रकारची सेवा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तासात 100किमी वेगाने
घेणार उड्डाण होवरबाईकसह कंपनीने दावा केला आहे, की याला एकावेळी 40 मिनिटापर्यंत उड्डाण घेता येणार आहे. यातील फ्लाइंग स्पीड हे 100 किमी प्रती तास राहणार असल्याचेही म्हटले आहे. पेट्रोलवर चालणाऱया एक कन्वेंशनल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. दुचाकीसाठी मोटर पॉवरसाठी चार बॅटऱया लावण्यात येणार असून यांची किमत साधारण 5.09 कोटी रुपये राहणार असल्याची माहिती आहे.