विध्वंसक युद्धनौका अन् विमानांद्वारे चिनी पाणबुडीला पिटाळले
वृत्तसंस्था / टोकियो
आशियामध्ये विस्तारवादाचे आक्रमक रणनीति राबवू पाहणाऱया चीनला जपानने चांगलाच धडा शिकविला आहे. अलिकडेच जपानी जलक्षेत्रात घुसखोरी करणाऱया चिनी नौदलाच्या पाणबुडीला जपाने पिटाळून लावले आहे. या पाणबुडीला देशाच्या दक्षिण हिस्स्यातील बेटांनजीक पाहिले गेले होते. त्यानंतर जपानी नौदलाच्या अनेक युद्धनौका आणि सागरी गस्तविमानांना पूर्ण क्षेत्रात तैनात करण्यात आल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
जपानच्या नौदलाने कागोशिमा प्रांतामधील अमामी ओशिमा बेटानजीक एका पाणबुडीचा सुगावा लावला होता. याचबरोबर या क्षेत्रात एका चिनी डिस्ट्रॉयर देखील गस्त घालत होती. याचमुळे जपान नौदलाच्या युद्धनौकांनी पूर्ण भागातील गस्त वाढविली आहे. सागरी सीमेतील चीनच्या घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी मेरीटाइम पेट्रोलिंग एअरक्राफ्ट्सनाही तैनात करण्यात आले आहे.