वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जपानचा पुरूष टेनिसपटू केई निशीकोरी याला कोरोनाची लागण झाल्याने त्याने येथे सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
एटीपी मानांकनात 31 व्या स्थानावरील निशीकोरी कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्कात आला होता. फ्लोरिडामध्ये निशीकोरीची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला आता दोन आठवडय़ांचा कालावधी बाकी असल्याने आपण या स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही, असे निशीकोरीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 2014 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत निशीकोरीने उपविजेतेपद मिळविले होते.