टोकियो : जपान सरकार सध्याला कंपन्यांना चार दिवसाच्या कामाचा आठवडा करण्याचा विचार करते आहे. यासंदर्भात जपान सरकारने कंपन्यांनी विचार करावा, असे म्हटले आहे.कंपन्यांनी आठवडय़ाचे कामकाज पाच दिवस ऐवजी चार दिवस करावे. याबाबत कर्मचाऱयांना 4 दिवसाचे काम करण्याचा पर्याय दिला जावा. नोकरी, कुटुंबाची जबाबदारी व नवी कौशल्ये शिकण्यासाठी यासाठी कर्मचाऱयांना यामुळे वेळ देणे साध्य होणार असल्याचे मत जपान सरकारने नेंदवले आहे. चार दिवस काम केल्यास तीन दिवस इतर बाबींकरिता पुरेसे ठरतील, असेही सरकारने म्हटले आहे. यासंदर्भात सरकारने नवे आर्थिक धोरणही तयार केले आहे. पण या धोरणाला मात्र जनतेतून विरोध होताना दिसतो आहे. अर्थतज्ञ मार्टीन शुल्स यांनी महामारीदरम्यान देशातील कंपन्यांनी काम करण्याच्या नव्या पद्धती आत्मसात केल्या असल्याचे सांगत कंपन्या कर्मचाऱयांना घर, ऑफिसपासून दूर ग्राहकांपाशीच काम करण्याची मुभा देत असल्याचा उल्लेख केला आहे.
Next Article ताज हॉटेलमध्ये घुसणाऱया अतिरेक्यांना रोखा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.