600 रुपयांमध्ये मिळतेय किडय़ांचे पॅकेट
जपानमध्ये कधीकाळी तळलेल्या किंवा भाजलेल्या किडय़ांना आणि टोळांना सोया-सॉसमध्ये शिजवून खाण्याची परंपरा होती. आता पुन्हा हा ट्रेंड परतत आहे. खाण्यात किडय़ांना सामील करण्यामागील कारण चकित करणारे आहे. किडे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारची प्रथिने मिळतात असे तज्ञांचे सांगणे आहे. तेथे अनेक प्रकारचे किडे पॅकेटमध्ये 600 रुपयांमध्ये विकण्यात येत आहेत.
अन्न आत्मनिर्भरता प्रकरणी जपानची स्थिती अत्यंत खराब आहे. येथील अन्नाबाबतची स्वयंपूर्णता केवळ 37 टक्के आहे. याचमुळे जपानमध्ये टोळ आणि किडे खाण्याचा ट्रेंड वाढत असल्याचे मानले जाते. आगामी काळात हवामान बदल आणि युक्रेन संकटामुळे स्थिती अधिकच गंभीर होणार असल्याचे कृषी तज्ञांचे मानणे आहे. अन्नाची कमतरता भरून काढण्यासाठी जपानमध्ये लोक भोजनात किडे-टोळ यांचा हळूहळू समावेश करत आहेत. तेथे काही किडय़ांचा वापर मेकअपची सामग्री, औषधांच्या निर्मितीसाठी केला जात होता. परंतु जपानचे लोक आता मोठय़ा आनंदाने हे किडे फस्त करत आहेत.
किटकयुक्त खाद्यपदार्थ
पॅकेटची विक्री चांगली राहिल्यास याच्याशी संबंधित उत्पादनांना वाढविण्यात येईल असे एका कंपनीने म्हटले आहे. याचबरोबर अनेक मोठय़ा कंपन्या आता किटकांचे फार्म तयार करत आहेत. रेस्टॉरंट मालक देखील किटकांपासून वेगवेगळय़ा प्रकारचे खाद्यपदार्थ तयार आहेत.
फूड कंपनीची निर्मिती
2019 मध्ये तोकुशिमा विद्यापीठातील डेव्हलप मेंटर बायोलॉजीचे प्राध्यापक ताकाहितो वतनबे यांनी फूड टेक्नॉलॉजी कंपनी ग्रिलसची स्थापना केली होती. या कंपनीच्या माध्यमातून किटक-टोळांना खाद्यस्रोत म्हणून विकसित करण्याचे कार्य सुरु आहे. ही कल्पना प्रोटीनची नासाडी दूर करण्यास मदत करत असयलाचे ताकाहितो यांनी म्हटले आहे.
लोकांनी अन्नाबद्दलची धारणा बदलायला हवी. अनेक किटक माणसांसाठी पौष्टिक आहार राहिले आहेत हे जाणून घ्यायला हवे. दक्षिण अमेरिकेपासून आशियापर्यंत किटकांना अन्नाप्रमाणे खाल्ले जाते असे उद्गार जपानच्या प्रसिद्ध लेखिका शोइची उचियामा यांनी काढले आहेत.