जंगलांचे सरासरी प्रमाण जगाच्या दुप्पट, देशात लाकडापासून इमारतींपासून उपग्रहांची निर्मिती
नवोन्मेषात अग्रगण्य राहणारा जपान आता पर्यावरण रक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे. जपानच्या वैज्ञानिकांनी चालू वर्षात लाकडाने तयार करण्यात आलेला उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा केली आहे. जगात अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. जपानमध्ये मोठय़ा प्रमाणात लाकूड असल्याने नवोन्मेषासाठी आता उंच इमारती, स्कायस्क्रॅपर आणि वाहनांमध्ये देखील लाकडाचा वापर करण्यात येतोय.
लाकडाने तयार करण्यात आलेला उपग्रह पूर्णपणे पर्यावरणस्नेही असणार आहे. तसेच त्याच्या निर्मितीकरता कमी खर्च येणार आहे. मोहीम संपल्यावर उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यावर पूर्णपणे जळून जाणार असल्याने अंतराळात कचऱयाची समस्या उद्भवणार नाही. यापूर्वी सुमोमितो टोकियोमध्ये लाकडाने तयार होणाऱया गगनचुंबी इमारत निर्मितीचा प्रकल्प सादर करण्यात आला आहे.
लाकडाने इमारतीची निर्मिती
सुमिमोतोच्या सुकुबा लॅबने 70 मजली स्कायस्क्रॅपरचे डिझाइन तयार केले आहे. स्टीलच्या रचनेने निर्माण होणाऱया या इमारतीत 90 टक्के निर्मिती सामग्री लाकडाची असणार आहे. यावर सुमारे 44 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. जपानमध्ये भूकंप आणि वादळं वारंवार येत असल्याने हे स्ट्रक्चर टय़ूबुलर असेल. आर्किटेक्चर निक्केन सेक्केई यावर काम करत आहेत. टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या स्टेडियममध्येही मोठय़ा प्रमाणावर लाकडाचा वापर करण्यात आला होता.
2.5 कोटी हेक्टरमध्ये फैलावलेले जंगल
जपानमध्ये 2.5 कोटी हेक्टर क्षेत्रात जंगल फैलावलेले आहे. हा आकडा देशाच्या क्षेत्रफळाच्या 70 टक्के इतका आहे. जगाच्या सरासरी जंगलक्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पटीपेक्षा आहे. याचमुळे जपान सरकार विकासकांना लाकडाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारने लाकडाच्या वापराला चालना देण्यासाठी कायदाही आणला आहे. याच्या अंतर्गत तीनमजली किंवा त्याहून अधिक उंच सर्व इमारतींमध्ये लाकडाचा अधिकाधिक वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
वाहनउद्योगही सामील वुडन सॅटेलाइटसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये लाकडाचा वापर होतोय. देशातील वाहननिर्मिती उद्योगाही लाकडासोबत नवे प्रयोग करत आहे. टोयोटो मोटोकॉर्पने डिसेंबर महिन्यात लाकडाने तयार करण्यात आलेल्या कोरोला कारचे परीक्षण केले आहे. आता या कारमध्ये सुधारणा करत व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.