गोलाकार ऑडिटोरियममध्ये नृत्य
प्रेक्षकांनी क्यूबिकलमये बसून छिद्रांमधून पाहत घेतला आनंद
जपानच्या अकिता शहरात आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव ‘ओडुरू अकिता’चे आयोजन झाले आहे. या महोत्सवात सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्हावे याकरता आयोजकाहंनी अनोखी पद्धत शोधून काढली आहेत. आयोजकांनी एका मोठय़ा रंगमंचाचे नुतनीकरण करविले आहे. यात गोलाकार ऑडिटोरियम तयार करण्यात आला. या ऑडिटोरियमच्या चहुबाजूला 30 क्यूबिकल तयार करण्यात आले आणि त्यात छोटी छोटी छिद्रे पाडण्यात आली. या छिद्रांमधून प्रेक्षकांनी महोत्सवाचा आनंद घेतला आहे.
यंदा महामारी पाहता मर्यादिक लोकांनाच महोत्सवात प्रवेश देण्यात आला. शोची वेळही 40 मिनिटे ठेवण्यात आली होती. एका शोमध्ये 30 लोकांनाच प्रवेश देण्यात आल्याची माहिती आयोजक शिंतारो तनाका यांनी दिली आहे.
जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग फारसा फैलावला नसला तरीही तेथे विशेष काळजी घेतली जात आहे. पुढील महिन्यात टोकियो शहरात ऑलिम्पिक होणार असल्याने अनेक प्रकारच्या नव्या उपाययोजना केल्या जात आहेत. याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. विशेषकरून रोबोटिक्सचा वापर वाढविण्यात आला आहे.