स्थूलपणा किंवा जाड असणे ही समस्या वाढती आहे. व्यक्तीचे वजन अधिक असेल तेव्हा ते कमी करण्यासाठी अनेकविध उपाय, उपचार करून पाहातो. अशा व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी जपानी वॉटर थेरेपीचा अवलंब नक्कीच करता येईल.
वजन खूप वाढल्यानंतर अनेक प्रयत्नांनी वजन कमी करतो. जपानी वॉटर थेरेपी ही देखील एक प्रभावी पद्धती आहे. तिचा वापर करून वजन कमी करण्याचे प्रयत्न जरूर करू शकतो.
या थेरेपीमुळे केवळ वजनच कमी होईल असे नाही तर जपानी लोकांप्राणे त्वचा नितळ, डागरहित आणि चमकदार होते. आरोग्याचे इतरही फायदे या थेरेपीतून होऊ शकतात.
- जपानी लोकांकडे ही दैनंदिन जीवनशैली असावी.
- जपानी लोक सकाळी उठल्यानंतर दात न घातला 2-3 ग्लास साधे पाणी पितात. त्यांच्या मते गार किंवा थंड पाण्याचे सेवन करणे शरीरासाठी चांगले नाही. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे अनशापोटी पाणी पिताना ते कोमट किंवा सर्वसाधारण तापमानाचे असावे. माठातील थंड किंवा फ्रीजमधील गार पाणी नसावे.
- पाणी प्यायल्यानंतर 45 मिनिटांनी जपानी लोक न्याहारी करतात.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपानी लोक एका वेळी फक्त 15 मिनिटेच खातात, तसेच दोन जेवणात 2 तासाचे अंतर जरूर ठेवतात.
- आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही थेरेपी अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
- संपूर्ण महिनाभर ही थेरेपी आपलीशी केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते. ही थेरेपी टाईप 2 मधुमेहातही फायदेशीर ठरते.
- या थेरेपी दरम्यान शरीरातील कॅलरी इंटेक खूप कमी होतो. शरीराला पाण्याची कमतरता न भासल्याने मेंदूची कार्ये अधिक उत्तम प्रकारे होतात. उर्जेची पातळी वाढते. रक्तदाब नियंत्रित होण्यासही या थेरेपीची मदत होते.
- ही थेरेपी परदेशी आहे परंतू नक्कीच प्रभावी असेल. मात्र कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर ही थेरेपी अंगिकारताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.