ऑनलाईन टीम / टोकियो :
फुकुशिमाचे दहा लाखांहून अधिक टन किरणोत्सर्गी पाणी थेट समुद्रात सोडण्याच्या निर्णयाला जपान सरकारने मंजुरी दिली असल्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी मंगळवारी सांगितले. जपान सरकारच्या या निर्णयाला शेजारील देश आणि स्थानिक मच्छिमारांनी कडाडून विरोध केला आहे.
मार्च 2011 मध्ये भूकंप आणि त्सुनामीमुळे फुकुशिमा दाइची अणुप्रकल्प नष्ट झाला. तेव्हापासून जपानी वीज कंपनी टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने दहा लाखांहून अधिक टन किरणोत्सर्गी पाणी जमा केले असून, आता जपान सरकारने हे पाणी थेट समुद्रात सोडण्यासाठी मान्यता दिली आहे. मात्र, स्थानिक मच्छिमारांनी आणि दक्षिण कोरियापासून फिलिपाईन्स आणि चीनने चिंता व्यक्त करत या निर्णयाला विरोध केला आहे.