प्रतिनिधी / पुसेगाव :
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरारी असलेला आरोपी दत्तात्रय दादासो मसुगडे ( वय 22 ,राहणार – रणसिंगवाडी ,ता. खटाव ) यास रणसिंगवाडी येथे पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली.
सोमवारी (दि. 25) रात्री 11 ते मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पुसेगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून जबरी चोरी व अन्य गुन्ह्यातील फरारी आरोपीस गजाआड केले . पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी विशेष मोहीम राबवून पुसेगाव पोलिसांना फरारी आरोपीच्या अटकेबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मसगुडे यास अटक केली.