संशयित आरोपीकडून ३ लाख ६ हजार ८००रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिराळा / वार्ताहर
कोकरूड (ता.शिराळा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत चरण गावांमध्ये झालेल्या जबरी चोरीतील आरोपींचा शोध घेऊन शिराळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपीस अतीशय शिताफीने, व धाडसाने पाठलाग करून जेरबंद केले. यावेळी संशयित आरोपीकडून ३ लाख ६ हजार ८००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिराळा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, चरण ( ता.शिराळा ) येथील चोरीतील एका संशयित आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे, तर संबंधित गुन्ह्यातील दोन संशयित पळून गेले आहेत. शलमून प्रफुल्ल कांबळे (वय २६ रा इस्लामपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून दोन संशयित पळून गेले.
चरण येथे शुक्रवार दि.२५ रोजी रात्री ९:३० च्या दरम्यान चरण येथील संजय आनंदा पुजारी ( वय ५२) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश करुन संजय पुजारी व नंदा भोसले यांच्या गळ्यास लोखंडी सुरा लावून जीवे तसेच ठार मारण्याची धमकी दिली व संजय पुजारी यांच्या दोन सोन्याच्या साखळ्या व डाव्या हातातील दोन अंगठ्या असे ५४ ग्रॅमचे सोने तसेच पॅन्टच्या खिशातील २६ हजार ८०० रूपये असा एकूण ३ लाख ६ हजार ८०० रूपयेचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. याबाबत संजय पुजारी यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली आहे.
यावरून शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्यासह हवालदार चंद्रकांत कांबळे, अमर जाधव , महेश साळुंखे तसेच होमगार्ड एस.एस. मेतूगडे, एम.आर. चव्हाण यांनी मोटारसायकलचा पाठलाग करून संशयित शलमून प्रफुल्ल कांबळे (वय २६ रा इस्लामपूर) यास पकडले यावेळी दोन संशयित आरोपी गोल्या जाधव व सोन्या माने (दोन्ही रा. इस्लामपूर) हे पळून गेले. यावेळी संशयित आरोपी शलमून कांबळे संशयित आरोपी कडून ३ लाख ६ हजार ८०० रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे