सातारा / प्रतिनिधी :
जबरी चोरीप्रकरणी तडीपार गुंडास अटक करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. दत्तात्रय उत्तम घाडगे, वय 30, रा. शिवशंभो कॉलनी, दौलत नगर, सातारा असे तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी मार्च 2021 पासून सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष करता हद्दपार केले होते.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास सातारा बस स्थानक समोरील एका चायनीज सेंटरवर एक तडीपार गुंड चायनीज खाण्यासाठी आला होता. त्यावेळी चायनीज सेंटरचे मालक हे कॅश काउंटरवर बसून ड्रायव्हर मधील पैसे मोजत असताना त्याने त्यांच्याजवळ जाऊन 1200 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्याला सेंटर मालकाने प्रतिकार केला असता त्या गुंडाने चाकू काढून त्याला घाबरून त्यांनी तेथून पलायन केले होते. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शाहूपुरी पोलिसांनी संबंधित गुंड दत्तात्रय घाडगे याला अटक करून चोरी केलेली रोख रक्कम व चाकू हस्तगत केला आहे.