जमखंडी
जमखंडी तालुक्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव लक्षात घेता सोमवार दि. 13 पासून नित्य दुपारी 2 नंतर काही अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय व्यापारी व अधिकाऱयांच्या बैठकीत घेण्यात आला व याला जनतेने सहकार्य करावे व मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन आमदार आनंद न्यामगौड यांनी केले.
जमखंडीतील मिनी विधानसौध येथे विविध संघटनेचे व्यापारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची सभा घेण्यात आली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनावर यावर नियंत्रण आणण्याकरिता सोमवारपासून नित्य दुपारी दोन नंतर सर्व दुकाने, पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. औषध, दुध, दवाखाने यातून वगळण्यात आले. सराफ, कापड, किराणा, पेट्रोल पंप आदी व्यापारी संघटनेने स्वयंप्रेरणेने हा निर्णय घेतला असून या सभेस तहसीलदार संजय इंगळे, नगरपालिका आयुक्त रामकृष्ण सिद्दनकोळ्ळ, सीपीआय डी. के. पाटील, पीएसआय बसवराज अवटी, नगरसेवक राजू पिसाळ आदी उपस्थित होते.