वार्ताहर/ जमखंडी
जमखंडीतील एका खासगी गोदामावर पोलीस, महसूल, महिला व बाल कल्याण, मध्यान्ह आहार आदी खात्याच्या अधिकाऱयांनी धाड टाकून क्षीरभाग्य योजनेतील दुधाच्या पावडरसाठा व अन्य साहित्य जप्त केल्याचा प्रकार घडला.
येथील महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकारी अनुराधा हादीमनी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी येथील एलआयसी कार्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या एका खासगी मालकीच्या गोदामावर धाड टाकून 250 हून अधिक दूध पावडरची पाकिटे व अंदाजे 2 लाख किमतीचे अन्य साहित्य जप्त केले.
बेकायदेशीर साठा कोणत्या खात्याचा आहे. याचा तपास लावण्यात येत असून गोदाम मालक व भाडेकरू यांनी सहकार्य केले नसल्याने तपास कामाला विलंब होत असल्याचे सीपीआय धरेगौडा पाटील यांनी सांगितले.
शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय गोविंदगौडा पाटील, तहसीलदार एस. बी. इंगळे, सीडीपीओ अनुराधा हादीमनी अक्षरदासोह अधिकारी बसवराज ऐनापूर आदींनी कारवाईत भाग घेतला. शहर पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे.
सरकारी योजनेत बेकायदेशीर प्रकार वाढले असून मुलांना देण्याचे खाद्याचा काळा बाजार होत असून अशा विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी यांनी केली असून यामागे राजकीय प्रमुख असल्याचा संशय व्यक्त करून याचे खंडण केले.