वार्ताहर/ जमखंडी
येथील राज्य रस्ता वाहतूक संस्थेच्या हुन्नूरजवळील बस आगारात कोरोना लसीकरणास तालुका वैद्याधिकारी डॉ. गैबुसाब गलगली यांच्या हस्ते चालना देण्यात आली. बसचालक, वाहक, मेकॅनिक व कर्मचाऱयांना लस देण्यात आली. लवकरच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लस देण्यात येणार असल्याने तहसीलदार प्रशांत चनगोंड यांनी सांगितले. आगार व्यवस्थापक संगमेश मटोळी, आरोग्य खात्याचे उमेश जोशी उपस्थित होते.