चोरीच्या बारा मोटारसायकली, तीन मोबाईल, 8 ग्रॅम सोने हस्तगत
वार्ताहर/ जमखंडी
पाच लुटारुंना अटक करून त्यांच्याजवळील चोरीच्या बारा मोटारसायकली, 3 मोबाईल, 8 ग्रॅम सोने असा अंदाजे 5 लाख 65 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. जमखंडी पोलिसांनी ही कारवाई करून पाच संशयित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
जमखंडीतील जंबगी कॅनॉलजवळील बायपास रस्त्यावर पाच जण उभे होते. पोलिसांना या अनोळखी व्यक्तींचा संशय आल्याने त्यांची विचारपूस केली व ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरीचा माल जप्त केला. गजानन सदाशिव हणमापूर, रा, सुटट्टी, ता. अथणी, जोतिबा सिद्दलिंगप्पा बंगी. रा. अथणी, कुमार यल्लाप्पा खिलारी, रा. राजापूर, ता. गोकाक, आनंद भीमाप्पा जनोज, रा. सवदी, ता. अथणी, दिलीप नानासाब चव्हाण, रा. अथणी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून अथणी, गोकाक, निपाणी, संकेश्वर, मिरज, चिकोडी, घटप्रभा, यरगट्टी, मुगळखोड, जमखंडी तालुक्मयातील अडीहुडी, मदरखंडी, जमखंडी बायपास रस्ता आदी ठिकाणी चोऱया व लूट प्रकरणी आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील अंदाजे 5 लाख 65 हजार रुपयांचा माल व चार चाकू जप्त करण्यात आले.
बागलकोट जिल्हा पोलीसप्रमुख लोकेश जगलासर, डीवायएसपी एम. पांडुरंगय्या, सीपीआय आय. एम. मठपती यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय बसवराज कोण्णूर, ग्रामीण पीएसआय वसंत बंडगार, सावळगी पीएसआय सचिन आलमेलकर व पोलिसांनी कारवाईत भाग घेतला.
जुगाराची 24 प्रकरणे दाखल
बागलकोट जिल्हय़ात दि. 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान जुगाराची 24 प्रकरणे दाखल करून 194 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 लाख 10 हजार रुपये हस्तगत केल्याची माहिती एसपी लोकेश जगलासर यांनी दिली.
बागलकोट 5, इलकल 3, हुनगुंद 2, अमिनगड 1, बिळगी 2, बदामी 2, गुळेदगुड्ड 1, महालिंगपूर 1, नवनगर 2, तेरदाळ 1, केरुर 3 अशी प्रकरणे दाखल करण्यात आली.