वार्ताहर/ जमखंडी
दिवंगत नेते सिद्दू न्यामगौड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त येथील ज्वारी बाजार चौकात कार्यकर्त्यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत नेते सिद्दू न्यामगौड यांनी या भागात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत असलेले त्यांचे पूत्र आमदार आनंद न्यामगौड यांच्याकडूनही जनसेवेचे कार्य घडावे, असे माजी उपनगराध्यक्ष राजेसाब कडकोळ यांनी सांगितले. नगराध्यक्ष सिद्दू मिशी, ऍड. एस. आर. काडगी, बसवराज हरकंगी उपस्थित होते.