वार्ताहर/ जमखंडी
जमखंडीतील सीलडाऊन भागाची पाहणी जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी केली. जमखंडीत पोलीस वसाहत, अवटी गल्ली, बहारपेठ वसाहत भागात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर हे भाग पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांनी घराबाहेर येऊ नये याची सूचना देण्यात आली असून या भागातील नागराकंना फळभाजी, किराणा, दूध आदी घरपोच पोहचविण्याचा आदेश नगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अत्यंत गरजेच्या प्रसंगी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
बागलकोट जिल्हा पोलीस प्रमुख लोकेश जगलापूर, असि. कमिशनर डॉ. सिद्दू हुल्लोळ्ळी, डीवायएसपी आर. के. पाटील, तहसीलदार एस. बी. इंगळे, नगरपालिका आयुक्त रामकृष्ण सिद्दनकोळ, तालुका वैद्याधिकारी डॉ. जी. एस. गलगली, सीपीआय घरीगौडा पाटील, पीएसआय बसवराज अवटी, गोविंदगौडा पाटील आदी उपस्थित होते.