वार्ताहर / जमखंडी
जमखंडी तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचे ग्रामीण भाजप अध्यक्ष एम. बी. न्यामगौड यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ग्रामीण अभिवृद्धी योजना या विजयाला कारणीभूत असून 464 जागा करीता झालेल्या निवडणुकीत 253 जागा आपल्या पक्षाचा पाठींबा असलेले उमेदवार विजयी झाले असून 16 पंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचे त्यांनी सांगितले.
विजयी उमेदवारासमवेत भाजप कार्यकत्यांनी विजयोत्सव साजरा केला. त्यात अजय कडपट्टी, डॉ. विजयलक्ष्मी तुंगळ, सुरेश गौडा पाटील, रायणा जाधव, गणेश शिरगण्णवर, विनायक पवार सुर्यवंशी आदिंनी भाग घेतला.