वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी तालुका पंचायत व महिला व बालकल्याण खात्याने बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या प्रचाराचा लोगोचे प्रकाशन केले. केंद्र सरकारची महत्वकांक्षी ही योजना असून ग्रामीण भागापर्यंत पोचविण्याकरिता व्यापक प्रचार करून मुलींचे संगोपन व शिक्षण याचे महत्त्व पटवून देण्याची ग्वाही तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी अबिद गद्याळ यांनी दिली. महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी अनुराधा हादीमनी, आनंद सज्जन, आर. एस. तिम्मापूर, एम. आय. पट्टणशेट्टी, के. जी. कोरगोळ आदी उपस्थित होते.