ऑनलाइन टीम / मुंबई :
जमात ए इस्लामी हिंद, असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल कैट्स आणि मुंबई मराठी पत्रकार संघकडून उद्या शनिवारी पत्रकार संघात ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात’ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संजय राऊत या कार्यक्रमात या कायद्याविरोधात आणि केंद्रसरकार बाबत काय भाष्य करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात संपूर्ण देशात मुस्लमि समुदायाने आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईतही या कायद्याविरोधात विविध संघटनांनी आंदोलन केलं होतं. आता जमात ए इस्लामी हिंद, एपीसीआर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने या कायद्याला विरोध दर्शविला असून त्यानिमित्ताने पत्रकार संघात शनिवारी एका परिसंवादाचं आयोजन केलं आहे.
या कार्यक्रमाला राऊत यांच्यासह माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसेपाटील, ज्येष्ठ वकील मिहिर देसाई आणि युसूफ मुछालाही उपस्थित राहणार आहेत.