प्रतिनिधी/ मडगाव
वाढत्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येमुळे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी 144 कलम लागू केले आहे. असे असले, तरी मडगावच्या शहरी भागात कोमुनिदाद इमारतीसमोर भरणारा बेकायदा बाजार रविवारी सकाळपासून सुरू होता. तेथे कोविडसंदर्भातील नियमावलीचा फज्जा उडविला गेला, तरी पालिका वा पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.
तयार कपडे व अन्य साहित्याची विक्री करणाऱया या बेकायदा विपेत्यांवर पालिकेकडून कारवाई होणे आवश्यक आहे. पालिका क्षेत्रात कोणताही बेकायदेशीर व्यवसाय होणार नाही हे पाहण्याची व त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. दररोज सायंकाळी तसेच रविवारी संपूर्ण दिवस हा बेकायदेशीर बाजार पालिका इमारतीच्या नजीकच भरत आला असला, तरी पालिकेच्या मार्केट निरीक्षकांकडून या बेकायदा बाजारावर कधी कारवाई होताना दिसून आलेली नाही. येथील बहुतांश विपेते परप्रांतीय असले, तरी राजकीय आशीर्वाद असल्याने पालिकेचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास धजत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच संबंधितांना या विपेत्यांकडून हप्ते दिले जात असल्याने जाणूनबुजून त्यांच्याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याची आरोपवजा प्रतिक्रिया एका माजी नगरसेवकाने व्यक्त केली.
पोलिसांकडून कारवाई आवश्यक
सध्या मडगावात कोविडचे 153 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातच सासष्टीत 27?1 सक्रिय रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत कोविडचे नियम धाब्यावर बसवून बेकायदा व्यवसाय करणाऱया या विपेत्यांवर कारवाई का केली जात नाही असे पोस्ट व्हॉट्सऍप व अन्य समाजमाध्यमांवर झळकू लागले आहेत. सध्या 144 कलम लागू असल्याने पोलिसांकडून कारवाई होणे आवश्यक आहे. हांकेच्या अंतरावर पोलीस स्थानक असून जेथे हा बेकायदा व्यवसाय चालतो तेथे म्हणजे कोमुनिदाद इमारतीसमोरच एक पोलीस बूथ आहे. तरीही त्यांच्याकडून या पदपथ व्यापून व्यवसाय करणाऱयांकडे कानाडोळा केला जात असल्याने मडगाववासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.